शाळांमधून दिलं जावं ते ज्ञान, दिली जाते ती माहिती, माहितीची देवाण घेवाण करतांना घडतात फक्त कारकून,
पुस्तकातून मिळते ती फक्त माहिती, ज्ञान नव्हे.

तेव्हा पुन्हा एकदा वळूया आपल्याच अस्सल भारतीय परंपरागत शिक्षणाकडे कारण ज्ञान दडलंय आपल्या आत,
ते उजागर करण्यासाठी आहे.

"SPICK & SPAN CONVENT"

शाळेची ठळक वैशिष्ट्ये

A school rooted in ancient Indian wisdom, designed for joyful, pressure-free learning.

Bagless School

No heavy schoolbags — learning happens through activity, discussion, and understanding rather than rote memorisation.

Seminars & Group Discussion

Students present topics in small groups (seminars), building confidence, communication, and deeper comprehension.

Meditation-Based Learning

Daily meditation builds intelligence, stability, concentration, and character — the foundation of true education.

Narration Method

Students narrate learned subjects in their own words, internalising concepts far beyond what textbook reading achieves.

Self-Directed Assessment

Students self-study, prepare questions, and tackle 40-mark papers — assessment grows naturally with their learning.

Character Building

Honest effort, diligence, and sensitivity are nurtured so students become responsible, independent individuals.

दप्तराशिवाय आनंदी व हसरी शाळा

"विद्यार्थ्यांनी १० वी ची परीक्षा संपल्यावर सांगीतलं, 'परीक्षा अतिशय सोपी गेली' कारण शाळेतच आम्ही परीक्षेचा भरपूर सराव केला होता."

Spick and Span convent ने प्रत्येक विषयाचे २५ पेपर्स सोडवून घेतले होते. Spick and Span convent मध्ये विद्यार्थी स्वयं अध्यायनाव्दारे अभ्यास करतात, तेव्हा प्रत्येक पायरीवर टप्प्या-टप्प्याने आकलन वाढत जात. जेव्हा विद्यार्थी धडा वाचतात तेव्हा धडयाच अनेक वेळा वाचन झाल्यावरच आकलन वाढतं व त्या नंतरच विद्यार्थी परिसंवादासाठी (Seminars साठी) तयार होतात.

विद्यार्थी प्रथम समूहात सेमिनार देतात व त्यानंतर पूर्ण धड्याच जवळ जवळ जसच्या तस कथन करतात. तेव्हा आकलनात बरीच वाढ झालेली असते. विद्यार्थी आता प्रश्न उत्तरे स्वत:च तयार करतात व त्यांना ४० मार्काचा पेपर सोडवता येतो व आकलनात पुन्हा वाढ होते. तो पेपर नीट अभ्यासला तर त्यात झालेल्या चुका विद्यार्थ्यांना कळतात व पुन्हा तोच पेपर सोडवला तर पुन्हा धड्याच्या आकलनात वाढ दिसते व त्या पेपर च्या मार्कांमध्ये पण.

या संपूर्ण पद्धतीत विद्यार्थ्यांकडून सुरवातीला खूप सहकार्य अपेक्षित आहे. पण नंतर जस जसा विद्यार्थी या पद्धतीला सहकार्य करतो तसा त्याच्यात आनंद आणि आत्मविश्वास जाणवतो. विद्यार्थ्यांला अभ्यासाला लागणारी बैठक जमायला लागते. त्याला अभ्यासाची गोडी लागते. पण आज होत काय, सगळाच प्रकार जबरदस्तीचा दिसतो.

विद्यार्थी अभ्यास करतांना त्याचा आनंद, त्याची आवड याचा जरा सुद्धा विचार होत नाही. उलट आज प्रत्येक टप्प्यावर अभ्यास निरस कंटाळवाणा ठरतो, मग अभ्यास विद्यार्थ्यांना नकोसा वाटला तरच नवल ठरते. तेव्हा ही विद्यार्थ्यांची महत्वाची अडचण Spick and Span ने सोडविली. अभ्यासात येणाऱ्या विविध समस्यांवर मार्ग काढला व अभ्यास, परीक्षा, मार्क हे सगळ सोप, आनंदी, सुलभ व सहज साध्य झालं.

विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या नोकरी व्यवसायात इतके गुंतलेले असतात की ते विद्यार्थ्यांच्या (पाल्यांच्या) समास्यांच्या मुळापर्यंत जाऊच शकत नाहीत. यावर शेवटी आमच्या शाळेनेच मार्ग/तोडगा काढला व आज विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. विद्यार्थी आनंदी असतील तरच आभ्यासाची आवड निर्माण झालेली दिसेल. विद्यार्थी म्हणजे रोबोट नव्हेत हवा तेंव्हा भरपूर अभ्यास करायला.

विद्यार्थ्यांना मन आहे. ते संवेदनशील आहे. ते अतिशय कौशल्यपूर्वक नाजूक हातांनी हाताळाव लागेल. पण हे कौशल्य शाळेला, शिक्षकांना प्रथम आत्मसात करावे लागेल व दिवसागणिक विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मार्कं मध्ये त्याच्या व्यक्तीमत्वात प्रगल्भता दिसेल.

Spick and Span मध्ये म्हणूनच मेहनतीचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजतो, ते कामसू बनतात. विनाकारण गप्पा करणे टाळतात. त्यांना त्यांचे ध्येय स्पष्टपणे दिसू लागते. मग अभ्यास लादावा लागत नाही. तो उस्फूर्तपणे होतो. अभ्यासाला लागणारे कष्ट घेणे विद्यार्थ्यांना आनंद देऊन जातात. विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, सातत्य दिसते. त्यांची कार्यशक्ती प्रज्वलित होऊन विद्यार्थ्यांच स्वतंत्र व्यक्तिमत्व घडतं.

या सर्व पद्धतींना खरी जोड मिळाली ते आमच्या शाळेत अतिशय निष्ठेने घेतलेल्या आनापान ध्यानाची. रोजच्या ध्यानानी विद्यार्थी एका जागी शांत बसून प्रत्येक श्वास जाणतात. तेंव्हा शांत, विचारी अस व्यक्तिमत्व स्वयं अध्ययना साठी उपयोगी ठरतं. तेंव्हा जाणवत, विद्यार्थी फक्त अभ्यास करायलाच नाही शिकले तर ते विचार करणारे, शांत, समयसूचक, कार्यप्रवीण, स्थिर, मेहनती, कष्टाळू, प्रामाणिक, संवेदनशील असे घडतात. म्हणून म्हणता येईल घड्यासारखेच ओल्या मातीला संस्कारक्षम करणे हेच ध्येय आहे Spick and Span या दप्तराशिवाय आनंदी शाळेच.

३० मार्च २०१९
डॉ. वीणा सावजी. संचालिका
Spick and Span Convent, Nagpur.
Students meditating in rows at Spick and Span Convent
  • २५ सराव पेपर्स प्रत्येक विषयात
  • स्वयं अध्ययन पद्धत
  • परिसंवाद (Seminar) पद्धत
  • ४० मार्काचे स्वयं-प्रश्नपत्रिका
  • आनापान ध्यान दैनंदिन
  • दप्तराशिवाय आनंदी शाळा

School Life at Spick & Span

Visitors: Site visitor count